Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

मा जिल्हाधिकारी धुळे यांना शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष ना डॉ तुषारभाऊ रंधे आमदार काशीरामदादा पावरा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिले

धुळे जिल्हयात माहे सप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात सततचा पाऊस,अतिवृष्टी , अवकाळी पाऊस या मुळे पिके.फळपिके व शेती यांचे नुकसान झाले असुन पावसामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेतजमिनीत पाणी साचले असुन पिकांची नासाडी झालेली आहे. 

शेती क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाणी थांबल्याने पिके मुळासकट नष्ट झाली असुन धुळे जिल्हयातीन शिरपूर तालुक्यात कोरडवाहु , बागायती,वार्षीक बागायती पिकांना तसेच पशुधन गोठा ,व इतर मालमत्ता यांस निकषा प्रमाणे सरसकट ओला दुष्काळ जाहिर होवुन आर्थिक मदत मिळावी व या वर्षाचे विजबिल तसेच पिक कर्ज माफ होवुन मिळावे हि विनंती केली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटिल, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, संचालक नरेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा शिरपूर शेतकरी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, जगन टेलर पावरा, जे. टी. पाटील आदी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध