Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बभळाज येथील सभागृहात,गावातील युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर



प्रतिनिधी :आज दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बभळाज येथील सभागृहात,गावातील युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर चे आयोजन करण्यात आले
       
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून थाळनेर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.उमेश बोरसे साहेब,पोलिस उपनिरीक्षक श्री.कृष्णा पाटील साहेब, पोलिस उपनिरीक्षक श्री कुंवर साहेब, बभळाज चे माहेर असलेल्या सहाय्यक क्षेत्र अधिकारी, जळगाव सौ.मोहिनी जाधव उपस्थित होते.                                            
शिबीराचे मार्गदर्शक मा.बोरसे सर,
मा.पाटील सर आणि मा.कुवर सरांचे गावातील तरुणांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शिबीराची सुरुवात झाली यावेळी या सर्व प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर बद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या व परिक्षांबाबत असलेले मनातील प्रश्न या सर्वांची उत्तरे मा.उमेश बोरसे सर आणि मा.पाटील सर ,मा.कुवर सर यांनी स्वतःच्या अनुभवातून देऊन अनमोल मार्गदर्शन केले.
     
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जाधव यांनी केले तर गावाचे पोलिस पाटील श्री.नितीन जाधव,श्री नरेश राठोड, राज जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.      कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  चि.प्रशांत राठोड,चि.अविनाश शिंदे,चि.धर्मराज राठोड,चि.सागर राजपुत,चि.अक्षय जाधव,राहुल पाटील,  ग्रा.पं.कर्मचारी दिपक(भावड्या) आणि राजेंद्र बंजारा, नरेश राठोड, राजू जाधव, चिंतन पाटील तसेच गावातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.मान्यवरांनी आपला अनमोल वेळ देऊन आमच्या गावातील होतकरु मुलांना मार्गदर्शन केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध