Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

धुळे जिल्हयातील सर्वात मोठा पावन ऊर्जा प्रकल्प साक्री तालुक्यातून रात्रीतूंनच बेपत्ता होण्याचा मार्गावर




धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या अमखेल गावाजवळ असलेल्या सुजलॉन प्रकल्प गेल्या 2005 - 06 पासून या पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या पंख्यांची मुदत जवळपास वीस वर्ष पर्यंत होती.परंतु आता पंधरा ते सोळा वर्षे एवढी मुदत असताना आता अचानक टावर खोलून नेण्याचा प्रकार सुजलॉन कंपनीकडून होत आहे.या परीसरातील पवन चक्की आता मध्येच आता अचानक सुजलॉन कंपनी कडून घेण्यात येत आहेत.


ज्यावेळेस सुजलॉन कंपनी कडून पवन ऊर्जा निर्माण करणारा टावर बसवण्यात आला त्या वेळेची किंमत सात कोटी एवढी होती. परंतु त्या वेळी शासनाने किंमतीच्या 50 टक्के अनुदान या पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीला दिले आहे. 

सुजलॉन कंपनी फक्त शासनाकडून अनुदान लाटण्यासाठी तालुक्यात आली का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे जिल्हा संघटक धीरज देसले यांनी उपस्थित केला. साक्री तालुक्यात अनेक प्रकल्प आले आणि रात्रीतच बंद झाले हा देखील प्रकल्प तसाच आहे की काय अशी शंका देसले यांना आली आणि तात्काळ देसले यांनी  न्यूज चॅनल धुळे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकल्प नेमका रात्री तू नच का पसार होत आहे हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला..

जेव्हा पंखा बसवला तेवा या वस्तू ची म्हनजेच यापंखाची किंमत सात करोड येवडी होती आणी, सर्वात मोठी गोष्टी म्हनजे शासनाने या पंखाना साडे तीन करोड रू सबसेडी दिली आहे तरी परतू ही सुजलाॅन कंपनी सबसेडी घेण्या पूर्ती होती का आसा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्मान सेना चे धुळे जिल्हा संघटक धिरज देसले व साक्री तालुका अध्यक्ष संदिप बच्छाव यांनी केले आहे तरी हे काम कश्या प्रकारे चालू आहे ते संबधित विभागाने लक्ष घालून चौकशी करावे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्मान सेना मनसे टाईल ने आदोलन करेल आसा ईशारा दिला आहे..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध