Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची धानोऱ्याच्या तरुणाला चौकशीसाठी नोटीस ? ; शिरपूर तालुक्यातील एक जणही गोत्यात !
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची धानोऱ्याच्या तरुणाला चौकशीसाठी नोटीस ? ; शिरपूर तालुक्यातील एक जणही गोत्यात !
जळगाव (प्रतिनिधी) चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी केलेले छापेमारीत चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाला नोटीस बजावली असल्याचे कळतेय. तर दुसरीकडे शिरपूर जवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एक व्यक्ती देखील जाळ्यात अडकल्याचे कळतेय.
ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुन्ह्याची एफआयार टाकण्यात आली आहे.
त्यानुसार धानोरा येथील दीपक नारायण पाटील मोबाईल क्रमांक (9834981952) तसेच राहुल भटा पावरा पोस्ट जोड्या, सांगवी, तालुका शिरपूर,जि.धुळे मोबाईल क्रमांक (9325784232) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु या गुन्ह्यात या दोघांचा नेमका काय सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पाटीलचा मुलाला नोटीस बजाण्यात आल्याचे कळतेय. तो मुलगा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असल्याचेही कळते. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून त्याने थोडी मुदत मागून घेतली, असल्याचेही कळतेय. यातील दीपक पाटील हे डिजिटल निरक्षर असल्याचेही कळते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोर यातून एकाची चौकशी करत नोटीस बजावली. नोटीस बजावणार लोकांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआर नुसार तब्बल 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणांवर छापेमारी
सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश – जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांसी, गाझियाबाद, मुजफ्फरनगरमध्ये छापे
गुजरात – जुनागढ,भावनगर, जामनगरमध्ये छापे
पंजाब – संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
बिहार – पाटणा, सिवान
हरयाणा – यमुनानगर, पानिपत,सिरसा, हिसार
ओडिशा – भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल
राजस्थान – अजमेर, झुंझुू, जयपूर, नागौर
मध्य प्रदेश – ग्वाल्हेर
महाराष्ट्र – जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
हिमाचल प्रदेश – सोलन
आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा