Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
चाळीसगाव पुन्हा हादरले चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आठ दिवसातली ही दुसरी घटना आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात
चाळीसगाव पुन्हा हादरले चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आठ दिवसातली ही दुसरी घटना आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात
(जळगाव) चाळीसगाव शहरात गेल्या आठवड्यातच एका 16 वर्षीयी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांनाच काल दि. 27 रोजी चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ उडाली असुन नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहरात गेल्या आठ दिवसात ही दुसरी घटना घडल्याने पंचक्रोशीतुन संतापाची लाट उमटू लागली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीला कठोरात कठोर शासन व्हाव्ही अशी मागणी येथील सामजिक कार्यकर्त्या तथा दक्षता समिती सदस्य सोनाली लोखंडे यानी केली आहे. पीडित मुलीच्या नात्यातला असलेल्या सावळाराम शिंदे या नराधमाने चिमुरडीला खाऊ घेऊन देण्याचं आमिष दाखऊन या बालिकेवर अत्याचार केले. नंतर त्या मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न या नराधमाने केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून तिच्या आईला वेगळी शँका आल्याने मुलीच्या आईने आरडाओरड केल्याने झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यानंतर संशयित आरोपी सावळाराम भानुदास शिंदे वय ( 26) हा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना लोकांनी पकडून त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं. चाळीसगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी बालिकेवर अत्याचार झाल्याचे सांगत बालिकेला इजा झाल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चिमुरडीच्या आईच्या फिर्यादीवरुन सावळाराम भानुदास शिंदे याच्या विरोधात भादवी कलम ३६३ सह विविध कलमान्वय गुन्हां दाखल करण्यत आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी / जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण व वेतन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे दलालांच्या थेट संपर्कात असल्याची गंभीर चर्चा जि...
-
पिंप्रीगवळी प्रतिनिधी - तालुका मोताळा, जिल्हा, बुलढाणा भागातील शेतीशिवारात काल शनिवारला रात्री अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य अवकाळी पाऊस पडल्यामु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा