Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१
शिरपूर शहरातील मच्छीबाजार परिसरातील नागरिकांनी नवीन ताडी दुकानासाठी विरोध..!
शिरपूर शहरात नवीन ताडी दुकानासाठी जागेची पाहणी करणाऱ्या व्यक्तीला मच्छीबाजार परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याच्या रागातून जुन्या ताडी दुकानदाराशिवीगाळ करीत परिवाराचे बरेवाईट व जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीहरी लिंगय्या यादवगिरीवार रा.कांशीराम नगर शिरपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे.दाखल फिर्यादीनुसार नंदुरबार येथील दिपक श्रीनिवास वंडीवार व त्याच्यासोबत 3 अज्ञात व्यक्तीं हे नवीन ताडी दुकाणासाठी मच्छीबाजार परिसरात 2 ते 3 वाजेच्या सुमारास जागा शोधत असतांना नागरिकांनी विरोध केला.
त्या रागातून मच्छीबाजार परिसरातील नागरिकांसमोरच प्लॉट नंबर 2 च्या मोकळ्या जागी जुन्या ताडी दुकानाजवळ दीपक दिपक श्रीनिवास वंडीवार व त्याच्यासोबत 3 अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करून संपूर्ण परिवाराचे बरेवाईट करण्याची धमकी देत फिर्यादी श्रीहरी यादवगिरीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली दाखल फिर्यादीवरून दीपक श्रीनिवास वंडीवार रा.नंदुरबार व 3 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ नारायण मालचे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया:- वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे ...
-
© डॉ. दिलीप तिवारी पाळधी - तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाचा तरसोदकडील भागाचा उजवीकडील भराव कोसळून तीन महिने होत आले आहेत. तेथील दुरुस्तीच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा