(नंदुरबार)- शहरातील 3 व्यक्तींच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून आज शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, नंदुरबार शहरातील संजय नगर,सूर्यवंशी नगर व कुंभारवाडा येथील तीन व्यक्तींना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात एकाच वेळेस तिघांच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा