Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे
मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे
राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवाना, डिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे यांनी दिली.
मंत्रालयातील दालनात राज्यातील मच्छिमार बांधवांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे बोलत होते.यावेळी या बैठकीला उपसचिव श्रीनिवास शास्त्री,मत्स्यव्यवसाय सहआयुक्त रा.ग.जाधव,मत्स्यव्यवसाय सहआयुक्त (सागरी) सं. गो. दप्तरदार, मच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळी,मुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपके,मंगेश कोळी, बिपीनचंद्र पाटील, आखिल भारतीय कोळी संघटनेच्या श्रीमती मालिनी वरळीकर, मच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यावेळी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे म्हणाले,सागरी महामार्ग जिथे होत आहे त्या ठिकाणी असणा-या कोळी बांधवाच्या अनेक मागण्या आहेत त्याबाबत तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठकीचे आयोजन करून त्यासंदर्भात मत्स्यव्यवसायिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.तसेच डिझेल विक्री परताव्याची रक्कम विहित वेळेत वितरण करणे, मत्स्यव्यवसायिकांना मासे विकण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातही कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे यांनी या बैठकीत दिली.
यावेळी मच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळी, मुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपके, मंगेश कोळी, बिपीनचंद्र पाटील,आखिल भारतीय कोळी संघटनेच्या श्रीमती मालिनी वरळीकर,मच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यांनी राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न बैठकीत मांडले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा