Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

अल्पवयीन कन्येचा ईच्छेविरुध्द होणारा विवाह व सारखरपुडा रद्द करण्यात व तिची सुटका करण्यात अ.आ.नि.स.च्या पदाधिकाऱ्यांना यश"



सटाणा (प्रतिनिधी) : रविवार दि२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सटाणा तालुक्यातील *"अंतापूर"* ह्या गावी एका १५ वर्षीय मुलीचा तीच्या मनाविरुद्ध साखरपुडा व विवाह करण्यात येणार असल्याची खबर अन्याय अत्याचार निर्मुलन समीती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रेमलता जाधव व उत्तर महाराष्ट्र सचिव सौ.जोशीला पगारिया यांना मुलीच्या आईवडील यांनी दिली. त्यांना विश्वासात न घेता अल्पवयीन मुलीचे आजोबा आजी काका ईत्यादीनी साखर पुड्याचे आयोजन केले होते. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे अल्पवयीन पीडित मुलीचे आईवडील यांनी न्याय मिळवून देण्यासाठी संपर्क साधला. त्यानंतर राज्य उपाध्यक्षा प्रेमलता जाधव व उत्तर महाराष्ट्र सचिव . जोशिला पगारीया धुळे जिल्हा अध्यक्षा शोभा नगराळे यांनी वेळेत घटनास्थळी जाऊन साखरपुडा व विवाह थांबवुन अल्पवयीन मुलीला आईच्या स्वाधीन केले. या प्रसंगी अशिक्षित २५० लोकांमधुन मुलीला सुखरूप बाहेर आणले हया वेळेस तेथील अशिक्षित सासरकडील व्यक्ती मुलीला मारण्यासाठी धावुन येत होती अशावेळेस अल्पवयीन मुलीला धक्का लागु नये म्हणून व संबधितांना थांबावितांना प्रेमाताई जाधव यांच्या हातालाही मुक्का मार लागला आहे. नंतर जायखेडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात येवुन अशिक्षित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या घटनेसंदर्भात अ.आ.नि.स.पदाधिकाऱ्यांचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे तसेच जोशीला पगरिया या विविध सस्थेशी जोडल्या गेल्या आहै सर्वस्तराहुन पगारियाताई यांचे कौतुक केले जात आहे साक्री सारख्या छोट्याश्या गावाच्या समाजसेविका समाजासाठी जे कार्य करताय ते खुप मोलाचे आहे अश्या या हिरकनी टीमचे अभिनंदन.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध