Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

शिरपूर तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायतीची दुरवस्था शंभर रुपयाच्या बल्ब खरेदी करून लावण्या इतपत निधी नाही आलेला निधी गेला कुठे ?



पुनमचंद मोरे वाघाडी प्रसिद्ध प्रमुख   

शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील,
वाल्मिक नगर परिसरातील वार्ड क्रमांक 4 येथील काही महिने पासून या गल्लीतली लाईट बंद असून याबाबत तेथील ग्रामस्थ यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याकडे खांबावरील लाईट बसवणे बाबत तक्रारी करून देखील सदर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले आहे याबाबत त्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीकडे कुठलाही प्रकारच्या फंड शिल्लक नाही. असे उत्तरे देण्यात आले. 

म्हणजेच ग्रामपंचायतीकडे 50 ते 100 रुपयाच्या बल्ब देखील खरेदी करून लावण्यात इतका फंड शिल्लक नाही इतका दुरवस्था वाघाडी ग्रामपंचायतीची झाली आहे काय ? असा प्रश्न जनते समोर निर्माण झाला आहे. 

चालू वित्तीय वर्ष सन 2021 व 2022 मध्ये रुपये 5707762.07 इतका निधी आलेला असून यातील 2760462.65 इतका निधी खर्च झाल्याचे ऑनलाइन दिसून येते मग उरलेला निधी नेमका गेला कुठे याबाबत परिसरातील जनता नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून याची  मागणी करणार असल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधीकडे प्राप्त झाला आहे व या घटनेच्या संपूर्ण पाठपुरावा तरुण गर्जना वृत्तपत्रामार्फत करण्यात येणार आहे, 

(वाचा सविस्तर प पुढील अंकात...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध