Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
गटशिक्षणाधिकारी खुळे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...
परंडा(राहूल शिंदे)दि.25 येथील पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांना लातूर येथील मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे दिला जाणारा 'मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते लातूर येथील दयानंद सभागृहात सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी राज्यातील - शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानव विकास सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. संस्थेने अशोक खुळे यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान केला आहे.
या कार्यक्रमासाठी पद्मश्री पोपटराव पवार , नेत्ररोगतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने,राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक इंद्रजीत भालेराव, मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे, विठ्ठल लहाने,मानव विकास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव घोगरे,नागनाथ देशमुख तसेच राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा