Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

भाजप नेते किरीट सोमय्या हे भाजप नेत्याचा भ्रष्टाचारावर डोळे झाक पना करत असल्याची प्रसार माध्यमांना दिली कबुली



किरीट सोमय्या म्हणतात मी फक्त सत्ताधारी नेत्यांवरच आरोप करणार!
किरीट सोमैय्या यांनी भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांकडे डोळेझाक करणार असल्याची पत्रकार परिषदेत दिली कबुली
मुंबई : अंबाजोगाई दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या यांची अंबाजोगाई येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.
धनंजय मुंडे यांच्यावर एका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या सोमैय्या यांचे बीड जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या घोटाळ्यांकडे काही पत्रकारांनी लक्ष वेधले, त्या घोटाळ्यांमधील पीडित देखील सामन्यात शेतकरी, गोरगरीब असल्याचेही लक्षात आणून दिले, मात्र किरीट सोमैय्या यांनी त्या प्रश्नांना बगल देण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसले.
अखेर भाजप नेत्यांच्या घोटाळ्यावर का बोलत नाहीत, असे स्पष्टच विचारल्यावर सोमैय्या यांनी आपण मागील दोन वर्षात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच आरोप करणार आहोत, भाजपच्या नेत्यांचे कुणाचे काही घोटाळे असतील तर ते मला माहित नाही, माझ्याकडे राज्यातून तक्रारी येतात मात्र त्या भाजप नेत्यांच्या नसतात, असे म्हणत भाजप नेत्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणार असल्याची कबुलीच सोमैय्या यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

  1. यावरून तरी प्रसार माध्यमांनी लक्ष वेधून जे वृत वहिनी किरीट सोमय्या यांच ठळक बातमी देतात ते किरीट सोमय्या कडे अक्कल गहाण ठेवी त असतील किंवा विकले गेले असतील पैसे घेतले असतील किरीट सोमय्या कडून राष्ट्रीय आणि राज्यातील न्यूज रिपोर्टर यांनी कारण देवेंद्र असो की गडकरी सोमय्या राणे आठवले आणि इतर बांडगुळ मंत्री संत्री आमदार खासदार यांचे वक्तव्य भाजपा चे नाही वेळोवेळी सांगतात तरी वृत्त वाहिन्या या बातम्या ठळक दाखवतात जनतेची दिशाभूल तर होते एक विशिष्ठ निजी स्वार्थी मंत्री मुळे किंवा आमदार खासदार मुळे शासन वर फरक पडत नाही त्यामुळे महविकड आघाडी वर टीका करणे पेक्षा केंद्र सरकारच्या चुका सोमय्या सारख्या कोणी काँग्रेस पार्टी चे प्रवक्ता ने काढल्या तर भाजपा नाही तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची बदनामी होईल आणि राजकारण लोकशाही साठी मारक होईल जनतेत जाणे पेक्षा कायद्याने सोमय्या ना भ्रष्टाचार कमी करता येईल परंतु तोड मोड करून असली राजकारणी आपला स्वार्थ साधत असतात हे ही जनतेला कळाले .

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध