Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

नो व्हॅक्सिन नो एंट्रीचे उल्लंघन गेल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई ! पालकमंत्री छगन भुजबळ



नाशिक। प्रतिनिधी : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओमायक्रॉन बाबत करावयाच्या तयारी व उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यात लसीकरणाची मंद गती बघता जिल्ह्यातील शासकीय,निमशासकीय कार्यालय,औद्योगिक वसाहतीत तसेच मार्केटमध्ये ‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’ चा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

४०१ मेट्रिक टन ऑक्सि जनची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आली. त्यापैकी जिल्ह्यात ३७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आलेली आहे. तसेच खाजगी उत्पादक धरून जिल्ह्यात ७१० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.ओमायक्रॉनसाठी आवश्यक तपासणी कीट खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

लसीकरणाचा वेग सध्या कमी असून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतांना नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे नो व्हॅक्सिन नो एंट्रीचे उल्लंघन गेल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येईल.एक आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन करतांना व्हॅक्सिन बाबत नियमावलीचे पालन करण्यात यावे त्यानुसारच कार्यक्रमास परवानगी मिळेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध