Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

कोरोना कडक निर्बंध जाहीर,उद्या मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू...

उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.8 कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

👉उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू
सकाळी 5 ते रात्री 11 राज्‍यात जमावबंदी लागू

👉रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू

👉मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

👉रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्‍के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

👉2डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार

👉राज्‍यातील शाळा,कॉलेजेस, क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

👉खासगी कंपन्यांमध्ये 2 डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

👉खासगी कार्यालये 50 टक्‍के क्षमतेने सुरू राहतील

👉लग्‍नासाठी 50लोकांनाच परवानगी.

👉हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

👉अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.

  राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध