Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १२ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
आता राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक (पाट्या) मराठीतच पाहिजेत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
आता राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक (पाट्या) मराठीतच पाहिजेत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई ,कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य महत्वाचे मंत्री या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळतेय.एकीकडे मुंबईसह राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, तसेच दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. या बैठकीत दुकानांवरील नामफलक अर्थात पाट्या या मराठी भाषेतच असाव्या असा सक्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

मराठीचे बेगडी प्रेम भरपूर झाले.75 एस टी कर्मचारी शहिद झाले ते काय काय पाकिस्तानी होते का? पाट्या बदलुन प्रश्न सुटनार नाहीत
उत्तर द्याहटवा