Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

स्थानिक गुन्हे शाखे कडून शेगावात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड..!सतरा दुचाकी जप्तं..!



शेगाव प्रतिनिधी: स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या कडून शेगाव शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात आली. या चोरट्यांकडून सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की शेगाव शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्यांची टोळी शेगाव येथीलच आहे या खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा च्या पथकाने 11 फेब्रुवारी सकाळपासून सापळा रचून शेगाव शहरातून व परिसरातून एकूण सतरा दुचाकी वाहने जप्त केली व यातील मोरक्या व इतर चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आणखी कुठे कुठे दुचाकी चोरीच्या घटना घडविण्यात आल्या याबाबत विचारपूस करण्यात येत आहे. 

पर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणावरून चोरीच्या 17 विना नंबरच्या दुचाकी वाहन जप्त करून शेगाव पोलीस स्टेशन आवारात जमा केल्या. अजूनही चोरी झालेल्या काही दुचाकी वाहने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध