Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२
बजाज समूहाचे दिशादर्शक दिग्गज उद्योजक राहुल बजाज यांचे दुःखद निधन
ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.
राहुल बजाज यांचा अल्प परिचय...
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले असून हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण पूर्ण केले होते.
बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. २००१ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. त्यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा