Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ मार्च, २०२२

प्रा.डॉ.हेमंत खैरनार यांना पुरस्कार प्रदान


    
शिरपूर येथील होमिओपॅथिक तज्ञ व सेंधवा होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख प्रा.डॉ.हेमंत खैरनार यांना एशियन एज्युकेशन अवॉर्ड्स यांच्यातर्फे यंदाचा इनोव्हेटिव्ह प्रोफेसर ऑफ द इयर 2022 पुरस्कार दिनांक 26 मार्च 2022 रोजी झालेल्या ऑनलाइन सोहळ्यात प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार डॉक्टर खैरनार यांच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील निरंतर उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. 

एशियन एज्युकेशन अवार्ड शैक्षणिक उत्कृष्टता प्रदान करण्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करतात. डॉ. खैरनार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात कौतुक व अभिनंदन होत आहे.

३ टिप्पण्या:

प्रसिद्ध