Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ मार्च, २०२२

नवहिंदू ज्यांनी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलाय त्यांना हा अंगार दाखवा..! उद्धव ठाकरे



शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो ते करुन दाखवतो आता युवा सैनिक पण आहेत. मी तुम्हाला शिवसेनेचा आणि भगव्याचा अंगार मानतो असं उद्धव ठाकरे म्हणाले . नवहिंदू ज्यांनी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलाय त्यांना हा अंगार दाखवा लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार महाराष्ट्र काय आहे.

हे दिल्ली पर्यंत कळेल,असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसंपर्क मोहीम नवीन नाही. त्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोचवायचे आहे.शिवसैनिक हाच त्यातला धगधगता निखारा तोच शिवसंपर्क अभियानाचा उद्देश शिवसेनेचे दूत गेल्यावर चांगली नावे माझ्याकडे आली पाहिजे. त्यांना नविन आधार देण्याची गरज आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध