Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जून, २०२२

शिंदखेडा येथे एका विवाहाच्या स्वागत समारंभात तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर नोटा उधळताना तलाठी तुषार पवार



शिंदखेडा प्रतिनिधी: शिंदखेडाचे शहर तलाठी तुषार पवार यांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर लग्नाच्या सार्वजनिक एका कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तालुक्यात त्याची चर्चा होत आहे.निमित्त होते,एका लग्नाच्या स्वागत सभांरभाच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे तहसीलदार सुनील सौंदाणे एका महिलेसोबत पान खाताना दिसत असून पानस्टॉलधारकाने अगोदर त्यांना पान दिले व त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला पान खाण्याची ऑफर दिली परंतु


त्या पान स्टॉलधारकाने त्या तहसीलदार सैंदाणे यांच्याकडे प्रसंगी त्या संबंधित महिलेला एक अंगुलिनिर्देश केला एवढेच नाही,या संबधित महीलेला ऐक शेय ऐकवला व एक गाणे वाजवले त्यामुळे त्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक होऊन दाद मिळवली त्यानंतर तलाठी पवार यांनी खिशातून नोटा काढून तहसीलदार सैंदाणे व त्या महिलेवर  सार्वजनिक समारंभात नोटांची उधळपट्टी करतानाचा सदर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 


सार्वजनिक ठिकाणी तहसीलदारवर असलेली स्वामीनिष्ठा दर्शविण्यासाठी तलाठीपवार यांनी नोटांची उधळण केल्याबद्दल जनमानसात महसूल खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. यावरजिल्हाधिकारी जलज शर्मा व शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे काय कारवाई करतात,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध