Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ जून, २०२२

पॅन्थर डॉ.राजन माकणीकर यांना अंधेरी पोटनिवडणूक विधान सभेची उमेदवारी.



मुंबई दि (प्रतिनिधी) 166 अंधेरी विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणुकीत आरटीआय आणी समाजिक कार्यकर्ते विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ.राजन माकणीकर यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या हृदय विकाराच्या झटक्याने खाली झालेल्या जागेसाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडू स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तर भाजपा कडून मुरर्जी पटेल यांची उमेदवारी निश्चित झाली आहे शिवाय समाजवादी व आम आदमी पक्षा कडूनही उमेदवार उभा करण्यात येणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन ईश्वर माकणीकर यांना उमेदवारी निश्चित झाली असून अंधेरी विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी मतदात्यांची संख्या अधिक असून डॉ. माकणीकर आपल्या जहाल लेखणी मुळे सुप्रसिद्ध आहेत, अनेक विकासकांना त्यांनी नामोहरम करून गरिबांना न्याय मिळवून दिला आहे.

धम्म आणी पॅन्थर चळवळीत त्यांचं मोलाच योगदान मानलं जात. जात्याधं लोकांत त्यांची चपराक असून जनसंपर्क दांडगा आहे.अनेक राजकीय व अराजकीय भ्रस्टाचारी लोकांच्या कुंडल्या पुराव्यासकट उघड केल्या आहेत. त्याला दिवंगत आमदार रमेश लटके व विकासक विमल शहा सुद्धा अपवाद आहेत.पॅन्थर चळवळीतील जहाल कार्यामुळे ते निर्भीड आणी निडर पणे वागतात त्यांचा दरारा ही तसाच आहे.

संविधान प्रसार व प्रचारक डॉ.माकणीकर यांची लोकप्रियता पाहता विजया साठी बांधनी करण्यात येत आहे. छत्री व वह्या पुस्तकांचे वाटप करुंन् मतदार राजापर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न आहे,माकणीकर ज्या परिसरात राहतात तो परिसर आंबेडकरी गड मानला जातो आणी वंचितांच्या साथी मुळे पॅन्थर डॉ.माकणीकर यांची उमेदवारी विरोधकांना नक्कीच डोकेदु:खी  ठरेलं, अस चित्र दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध