Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलिस स्टेशनच्या शोध पथकाची कामगिरी..!चोरटयाकडून ३ लाख रु.कि.च्या सोन्याच्या २ लगड हस्तगत..!
शिरपूर शहर पोलिस स्टेशनच्या शोध पथकाची कामगिरी..!चोरटयाकडून ३ लाख रु.कि.च्या सोन्याच्या २ लगड हस्तगत..!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेल्या घरपोडी प्रकरणातील गुन्ह्यांच्या उलगडा करण्यास शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला यश आले असून पकडून त्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.
शिरपूर शहर पो.स्टे. गुन २२४/२०२२ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हयातील फरार आरोपी नामे किरतलिया शिवराम तडवी रानवाड फलीया पो. मोहाला ता संघवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश हा चोपडा फाटयावर आलेला असल्याबाबत पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख शिरपूर शहर पो.स्टे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार त्याचा शोध घेणेकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पो उप नि/गणेश कुटे तसेच शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी चोपड़ा फाटयावर त्याचा शोध घेवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
वर नमुद आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा तसेच शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. १७०/२०२२ भादवि कलम ४५७,३८० गुनी २८३/२०२२ भादवि कलम ४५७.३८० प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली •दिली. तसेच त्याने स्वतः गुरनं २६१/२०२१ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा शकुंतला लॉन्स मागे राहणारे 'श्रीमती सखुबाई नागोसिंग जमादार रा.शंकर पांडु माळी नगर यांचे राहते घरी केल्याची कबुली देवून त्याने चोरी केलेले तसेच त्याचे हिश्श्यास आलेले सोन्याचे दागिणे ज्या सोनारांकडे त्याची पत्नी आजारी असल्याचे खोटे कारण सांगुन विक्री केले ते सेंधवा व बलवाडी जि.बडवाणी येथील सराफ दुकानदार यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर सोन्याचे दागिण्यांची तयार केलेली लगड हजर केल्याने त्या गुन्हयात जप्त केले असून त्यांचे कडून २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड अंदाजे ५ तोळे ( ५० ग्रम ) वजनाची व ५०,०००/- रुपये किमतीची सोन्याची लगड अंदाजे १ तोळे ( १० ग्राम वजनाची चे असे एकुण ०३,००,०००/- रुपये किमतीचे वरील प्रमाणे सोन्याची लगड गुन्हयात हस्तगत केली असुन त्यावरुन शिरपुर शहर पो.स्टे. १) गुरनं. २२४/२०२२, २) १७०/२०२२, ३) २८३/२०२२ व ४) २६१/२०२१ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे असे एकुण ०४ घरफोडी-चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.प्रविणकुमार पाटील,मा.अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव य मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप मेराळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख, सपोनि/गणेश फड, पोउनि / गणेश कुटे तसेच शोध पथकाचे पोहेका/ललित पाटील, लादूराम चौधरी, पोको/गोविंद काळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा, मनोज दाभाडे व ९०१ प्रशांत पवार (आर. सी.पी.) व होमगार्ड नाना अहिरे अशांनी मिळून केली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा