Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा शहर शिवारातील तलाठी तुषार पवार शेताच्या बांधावर-- ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 मधून नोंदणी साठी शेतकऱ्यांना दिली माहिती
शिंदखेडा शहर शिवारातील तलाठी तुषार पवार शेताच्या बांधावर-- ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 मधून नोंदणी साठी शेतकऱ्यांना दिली माहिती
शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी--शिंदखेडा शहर शिवारातील ई- पिक पाहणी प्रक्रिया प्रथम स्वतः शेतकऱ्यांना मोबाईल ॲप व्हर्जन-2 या नवीन सुधारणांमधून नोंदणी करावयाची असल्याने शेतकऱ्यांना सुलभ व सोप्या पद्धतीने माहिती देण्यासाठी शिंदखेडा शहर तलाठी तुषार पवार हे स्वतः विरदेल रोड पहिली फरशी परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन माहिती व मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील क्षेत्रीय कार्यालयामार्फत खरीप व रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (खातेदारांनी) स्वतःहून ई- पीक पाहणी नोंदणी करायची मोहीम हाती घेतली असून ही मोहीम मोबाईल ॲप व्हर्जन-2 या नवीन सुधारणातून होणार असून सदर खरीप हंगामासाठी 1 आॅगस्ट ते 15 ऑक्टोबर पर्यंत स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर जाऊन मोबाईल ॲप मधून करावयाची आहे. त्यानंतर तलाठी 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत याची पडताळणी करणार आहेत. त्यात काही त्रुटी आढळून आल्यास त्यावर तलाठी दुरुस्ती करणार आहेत. मोबाईल व्हर्जन-2 मधून शेतकऱ्यांना सुलभ व सोप्या भाषेत शिंदखेडा शहरातील तलाठी तुषार पवार हे स्वतः विरदेल परिसरातील पहिली फरशी शेताच्या बांधावर जाऊन अनेक शेतकऱ्यांना स्वतः प्रात्यक्षिक द्वारा समजावून सांगितले.शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक समस्यांचे यावेळी त्यांनी निराकरण केले.
याप्रसंगी शेतकरी सुनील चौधरी, कैलास तलवारे,देविदास ताराचंद पाटील, राजेंद्र अभिमान पाटील, रामसिंग गिरासे ,राजेंद्र चौधरी तसेच महिला शेतकरी त्याचप्रमाणे महसूल मित्र संदीप आखाडे ,अबू कुरेशी हे उपस्थित होते.
सुलभ व सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल शहर तलाठी तुषार पवार यांचे आभार मानत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपल्या खरीप हंगामातील पिकांची पीक पाहणी लवकरात लवकर करून घेण्याचे आव्हान तलाठी मार्फत शेतकरी सुनील चौधरी यांनी शहरातील शेतकऱ्यांना यावेळी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा