Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेड़ा येथे नारळ फोडून शहीद स्मारक-भूमिपूजन संपन्न..! खान्देश रक्षक ग्रूप मधे जल्लोशाचे वातावरण
शिंदखेड़ा येथे नारळ फोडून शहीद स्मारक-भूमिपूजन संपन्न..! खान्देश रक्षक ग्रूप मधे जल्लोशाचे वातावरण
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-
शिंदखेड़ा येथील साईलीला नगर येथे ओपन स्पेस च्या नियोजित जागेवर शहीद स्मारकाचे भूमि पूजन करण्यात आले.शहीद स्मारक निर्माण हेतु खान्देश रक्षक ग्रुप शिंदखेड़ा तर्फे नगरपंचायत शिंदखेड़ा कड़े जागेची मागणी करण्यात आली होती, मा नगराध्यक्षा रजनीताई वानखेड़े व गटनेते अनिल वानखेड़े तसेच सर्व नगरसेवक यांनी ह्या मागनीस प्राधान्य देऊन जमिनिचा ठराव मंजूर केला
त्यामुळे खान्देश रक्षक ग्रूपच्या सदस्यात जल्लोशाचे वातावरण तैयार झाले त्यांनी एकच सुरात मा नगराध्यक्षा रजनीताई वानखेड़े व गटनेते अनिल वानखेड़े तसेच सर्व नगरसेवक न प शिंदखेड़ा यांचे आभार व्यक्त केले.
खान्देश रक्षक ग्रूपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे व उप कार्यध्यक्ष भूषण पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
ह्यावेळी नगराध्यक्षा रजनीताई वानखेड़े,गटनेते अनिल वानखेड़े,
उपनगराध्यक्ष प्रकाश पाटिल,विरोधी पक्षनेते सुनील चौधरी,मुख्याधिकारी प्रशांत बिडगर,प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे,सीनेट सदस्य अमोल मराठे,भिला पाटिल,सुभाष माळी, पत्रकार परेश शाह, पत्रकार विनायक पवार,राजेंद्र मराठे,दादा मराठे,योगेश चौधरी,गुलाबराव बडगुजर दिनेश सूर्यवंशी,अनिल मराठे,मुकेश बडगुजर,
विजय वाघ,किरण देसले,निखिल मराठे,यश मराठे,निखिल बडगुजर,
जतिन पाटिल,राज वाघ,सागर बडगुजर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन खान्देश रक्षक ग्रूप ने केले तसेच कार्यक्रम यशस्विते साठी शौर्य फिजिकल अकेडमी च्या प्रशिक्षणार्थी नी मेहनत घेतली.मान्यवरांचे आभार भूषण पवार यांनी व्यक्त केले.घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा