Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील जेबापूर ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर,सरपंच पदी यमुनाबाई माळचे तर उपसरपंचपदी पॅनल प्रमुख श्री.मधुकर भदाणे यांची बहुमताने निवड
साक्री तालुक्यातील जेबापूर ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर,सरपंच पदी यमुनाबाई माळचे तर उपसरपंचपदी पॅनल प्रमुख श्री.मधुकर भदाणे यांची बहुमताने निवड
मौजे जेबापुर ता.साक्री जि.धुळे येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्याभरापूर्वी घेण्यात आली होती.त्यातच यापूर्वी तालुक्यात विशेष चर्चेत राहिलेली ग्रामपंचायत म्हणून जबापूर पेसा अंतर्गत असणारी ग्रामपंचायत खूपच चर्चेचा विषय झाली होती. गेल्या अडीच वर्षापासून एक ना अनेक कारणांवरून जेबापूर ग्रामपंचायत वादाचा भोवऱ्यात सापडली होती यामुळे शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आला होती मात्र या प्रशासकीय काळात गावाचा पाहिजेत असा विकास झाला नाही. व कालांतराने गावाच्या विकासाला चालण्या मिळण्यास अडथळे निर्माण झालेत.मात्र अडीच वर्षे उलटल्यानंतर शासनाच्या नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि जेबापूर ग्रामपंचायत मोर्चे बांधणी सुरुवात झाली.मागील सत्ताधाऱ्यांनी गावाच्या विकासाला अक्षरशा खीळ बसवली होती.म्हणून गावातील लोकांनी यावेळी परिवर्तन करण्याचे ठरवले होते.आणि त्याच धर्तीवर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्या कामाला सुरुवात देखील केली होती प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पूर्ण गाव एकवटले होते आणि यावेळी सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला होता आणि या सगळ्या परिस्थितीचा योग्य वापर करून यापूर्वी जेबापूर गावचा राजकारणात मोठा हातखंडा असणारे विद्यमान खासदार हिना गावित यांचे खंदे समर्थक मानले जाणारे श्री. मधुकर आप्पा भदाणे यांनी यावेळी थेट मैदानात उतरत विरोधकांचा धोबीपछाट करण्याचे ठरवले होते त्यांचा यापूर्वीचा राजकीय अनुभव पाहता त्याची काम करण्याची शैली,लोकांच्या समस्यांची असलेली जाण,आणि जिल्हास्तरावरील मोठ्या नेत्यां चा संपर्क याची सांगड घालत मधु आप्पांनी मोर्चे बांधणी करून गावातील तरुण,जेष्ठ नागरिक, महिलाभगिनी, आदिवासी बांधव,अशी एक अनोखी रचना साधत प्रतिस्पर्धी ची मात्र झोप उडवली होती. जेबापुर ग्रामपंचायत येथील सर्व नऊ जागांवर त्यांनी उमेदवार उभे करून माऊली पॅनल नावाने सर्वच उमेदवारांना निर्विवाद वर्चस्व ठेवत आप्पासाहेबांनी आपल्या बुद्धीच्या दुर्याच्या बळावर सत्ता खेचून आणली आणि प्रति स्पर्धेचे कंबरडे मोडले. तालुक्यात लक्ष लागून असलेल्या मोजक्याच चर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी जेबापूर ग्रामपंचायत नऊ जागांपैकी सर्वसाधारण जागेवर आपला स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करून मा.श्री मधुकर आनंदा भदाने जेबापूर यांनी स्वतः प्रचंड मतांनी विजयी सलामी देत आपल्या पॅनलच्या सर्वच जागा प्रचंड बहुमताने जिंकून आणल्या आणि विरोधकांचा सुपडा साफ केला. आज ग्रामपंचायत जेबापूर येथे दिनांक 21/8/2022.रोजी दुपारी 12 वाजता माऊली पॅनलचे सर्वेसर्वा श्री.आप्पासाहेब मधुकर भदाणे त्यांच्या सहकार्यांचा उपस्थित सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत घेण्यात आली त्यात (स्त्री राखीव गटातील) सरपंच पदी यमुनाबाई नंदू माळचे तर उपसरपंच पदी (सर्वसाधारण गटातील) पॅनल प्रमुख श्री मधुकर आनंदा भदाने यांना सर्वानुमते उपसरपंच पदी विराजमान करण्यात आले. यावेळी गावातील जेस्ट नागरिक तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच गावातील सर्व तरुन,आदिवासी बांधव, महिला विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी गावात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच सदस्यांची मिरवणूक काढून त्यांची जल्लोषात स्वागत करण्यात आले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा