Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनी चक्क एका आदिवासी बांधवचा शासनाला आत्मदहनाचा इशारा...!
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनी चक्क एका आदिवासी बांधवचा शासनाला आत्मदहनाचा इशारा...!
साक्री,येत्या 15 ऑगस्ट 2022/ 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत असताना मात्र साक्री तालुक्यातील पिंपळनेर वनपरिक्षेत्रात एक धक्कादायक प्रकार दिसून आला आहे एका आदिवासी मजुरी करणाऱ्या वनमजुरांचे पैसे वनविभागाने सन 2017 मधील 50 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत खड्डे खोदकामाची मजुरी न मिळाल्यामुळे 20 ते 25 मजुरांचे मुखर्दम म्हणून काम पाहणारे श्री वामन रायसिंग बेडसे मुक्काम पोस्ट टेंबे(उंबरफाटा जवळील) तालुका साक्री जिल्हा धुळे यांची कामाची मजुरी न मिळाल्यामुळे संबंधित तत्कालीन वनपाल श्रीमती वर्षा नारायण चव्हाण यांनी पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील म्हसदी परिमंडळात वनपाल म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्या संबंधित व ओळखीच्या लोकांच्या नावे शासनाचा पैसा मजुरांना न देता त्यांनी स्वतः कडे वर्ग केला व गरीब आदिवासी खरोखर काम करणाऱ्यांना त्यांचे कष्टाचे पैसे त्यांना न देता स्वतःच्या आर्थिक फायदा पोटी मोठा भ्रष्टाचार सन 2018/ 19 या वर्षी संबंधित वनरक्षक श्री सुरेश भाईदास पगारे यांनी त्यावेळेस वनविभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करून संबंधित तत्कालीन वनपाल यांच्यावर चौकशी दरम्यान अपहार केल्याचे सिद्ध झाले असून व त्यांना निलंबित केले असता त्यांच्याकडून संबंधित मजुरांचे हक्काचे पैसे आज तगायत देखील अदा केले नाही म्हणून श्री वामन रायसिंग बेडसे यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या दिवशी पिंपळनेर वनपरिक्षेत्र प्रादेशिक या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सर्व स्तरावर शासनाला कळवलेला आहे.
तरी संबंधित विभागाने प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेता त्या मजुरांचे पैसे देण्याचे प्रयोजन करावे नाहीतर असे म्हणता येईल की एकीकडेआपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे एका आदिवासीचे बांधवांचे शोषण करून अधिकारी वर्ग त्यांची आर्थिक पिळवणूक करून नेमके काय सिद्ध करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा