Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
बोरगांव वि का सोसायटी चेअरमन पदी योगेंद्रसिंग सिसोदिया तर व्हा चेअरमन पदी दगेसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड
बोरगांव वि का सोसायटी चेअरमन पदी योगेंद्रसिंग सिसोदिया तर व्हा चेअरमन पदी दगेसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील बोरगांव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 2022-27 या कालावधी साठीची संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली होती तर आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत बोरगांव चे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांची चेअरमन पदी तर व्हा चेअरमन पदी माजी सैनिक दगेसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे - सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून दगेसिंग मोहनसिंग राजपूत, रघुनाथ झुलाल कोळी, हिरालाल चिंधा पाटील,पदमसिंग बहादूर राजपूत,लोटन शंकर धनगर, रजेसिंग भुता राजपूत,भटेसिंग पोलदसिंग राजपूत, खंडू झिंगा राजपूत तर राखीव मतदार संघातून गोकुळ चिंधा येशी,हरी उत्तम भिल,योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया व महिला मतदार संघातून विमलबाई सुजानसिंग राजपूत आणि मंगला जगतसिंग राजपूत.
सहाय्यक निबंधक अशोक बागल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील व सोसायटी सचिव नरेंद्रसिंग दुर्योधन गिरासे यांनी कामकाज पाहिले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच नारायण लकडू राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी,रजेसिंग मोहनसिंग राजपूत, बी डी सिसोदिया सर,सुभाष बारकू न्हावी,जयराम पोपट पाटील,कौतिक तोताराम न्हावी, दीपक राजपूत,धनसिंग राजपूत,नानेसिंग राजपूत,रोहिदास उत्तम कोळी,संजीव सजन पाटील,गुलाब फुला भिल,तानकु उखडू भिल व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, मा नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मा नगरसेवक अशोक कलाल, जि. प. सदस्या अभिलाषा भरत पाटील, पं. स. सदस्या विठाबाई निंबा पाटील, मा पं. स. उपसभापती जगतसिंग राजपूत, कल्याण ठाणे येथील बोरगांवकर बिल्डर चे मालक संजय धोंडू बोरगांवकर आदींनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा