Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नृत्य स्पर्धा



शिरपूर प्रतिनिधी:आर.सी.पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शिरपूर येथे आज दि. 10/08/2022 वार बुधवार  रोजी स्वातंत्र्याचा अम्रृत महोत्सव - स्वराज्य महोत्सव या अनुषंगाने नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आली. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  शि.व.न.प.च्या नगरसेविका आशा राजेंद्र बागूल ,वर्षा देवरे   व शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पाटील सर उपस्थित होते. या प्रसंगी सुरुवातीला सरस्वती मातेचं व भारत मातेच्या  प्रतिमेच पूजन करण्यात आले.
   
यावेळीं आशा बागूल व  मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विषयी मार्गदर्शन केले.
    
नंतर नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली .नृत्य स्पर्धेत अतिशय उत्साह पुर्ण वातावरण दिसून आले. यावेळी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान विभूतींनी प्राणांचं बलिदान दिले त्या सर्व विभूतींचे बलिदान नृत्य स्पर्धेत साकार करण्यात आले.सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात  सहभागी झाले होते.  भारत माता, महात्मा गांधी  , लोकमान्य टिळक  , स्वातंत्र्य वीर सावरकर भगतसिंग  , झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा विविध वेशभूषांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींचा परिचय करून दिला.
 

सुत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम.ऋतुजा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे  मुख्याध्यापक गोपाल पाटील तसेच शाळेचे शिक्षक/शिक्षिका  करोडे सर ,दिपीका पाटील, स्नेहल शिंदे,  व्ही.जी सोनवणे, ऋतुजा मॅडम, संचिता पाटील , अनिल पावरा,  उज्वला दायमा श्रद्धा सराग, मनीषा भदाणे ,दिपीका फूलपगारे ,युवराज धनगर,पिंटु माळी यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध