आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी , कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याने आम्हा शिवसैनिकांत नवचैतन्य संचारले आहे. मतदारसंघाची थांबलेली विकासकामे मोठ्या गतीने होतील व जिल्ह्याला गतवैभव प्राप्त होईल.
-सतीष अर्जुन दैन (युवानेते,परंडा)
Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
प्रा.डॉ.तानाजीराव सावंताच्या कॅबिनेट मंत्रिपदाने परंड्यात जल्लोष...
परंडा (राहूल शिंदे)दि.१० मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंड- ळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आ.तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर परंडा तालुक्यात जल्लोष करण्यात आला.
आ.तानाजी सावंत हे भूम-परंडा-वाशी मतदार -संघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मंत्रि - मंडळात ते जलसंपदा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले होते. मात्र,राज्यात सत्ता बदलाच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना पुन्हा ठाकरे सरकार मध्ये संधी मिळाली नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये खदखद होती.परंतु,नुकत्याच झालेल्या सत्ता बदलाच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत राहिलेले प्रमुख सहकारी आ.तानाजी सावंत यांचा समावेश निश्चित मानला जात होता.मात्र, संधी कधी मिळणार याची उत्सुकता मतदारसंघात लागली होती.
आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी शपथविधी ग्रहण केल्यानंतर परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, गुलाल उधळून, एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी उस्मानाबाद जि.प चे माजी गटनेते दत्ता साळुंके,परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव,शहर प्रमुख बाळू गायकवाड, युवा नेते सतीष दैन, मा.नगरसेवक रत्नाकर शिंदे,सतीष मेहेर आदी सह शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा