Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
क्रांतीदिनामित्त शिरपूर ते चिमठाणे रॅली संपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी:चिमठाणे येथील हुतात्मा क्रांतीस्मारकावर अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.भारतावर इंग्रजाची सत्ता असतांना क्रांतीसेनानींनी १४ एप्रिल १९४४ रोजी इंग्रजांचा साडेपाच लाखांचा खजिना लुटला होता.
धुळे,बोरकुंड,होरपाडे,चिमठाणे अशा मार्गाने क्रांतिकारकांनी चिमठाण्याला गाडी लुटुन इंग्रजी सत्तेला हादरा दिला होता.या घटनेचे पडसाद इंग्लंडपर्यंत उमटले होते.क्रांतिदिवस व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त स्मारकावर अभिवादन करण्यात आले.
या लुटीत उत्तमराव पाटील,व्यंकटराव रणधीर,नागनाथ नायकवडी,शंकरराव माळी,डी.जी.लाड,विष्णूभाऊ पाटील,फकीराआप्पा देवरे,धोंडीराम माळी या व इतर थोर स्वातंत्र्यसेनानींनी सहभाग घेतला होता.त्यास्मरणार्थ अभिवादन करण्यात आले.या निमित्ताने शिरपूर ते चिमठाणे पर्यंत रॅली काढण्यात आली.किसान विद्या.प्रसारक संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पांढरा ड्रेस परिधान करुन व फेटा बांधुन,हातात तिरंगा घेऊन मोटारसायकलने रॅली काढली.या रॅलीचे नेतृत्व धुळे जि.प.अध्यक्ष ना.डॉ.तुषार रंधे,किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी केले.भारत माता की जय,वंदे मातरम,क्रांतीकारकांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
स्मारकावर डाॅ.तुषार रंधे,निशांत रंधे,शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सिमाताई रंधे,ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे,किसान विद्या.
प्रसारक संस्थेचे सदस्य श्यामकांत पाटील,बोराडी येथील श्री.देशमुख सोसायटीचे चेअरमन राज निकम,
संतोष माळी,विनायक माळी,
विनायक कोळी,पत्रकार संतोष भोई, सोमा धनगर,संजय सोनवणे, बापु धोबी, मोहण कोळी, सुभाष कोळी, योगेश धोबी,वसंत माळी,ज्ञानेश्वर बडगुजर,नितीन पाटील, निश्चल पाटील,आर.टी.पाटील,किशोर भदाणे,रविंद्र शिंदे,संजय गुजर,संजय जगदेव,आनंदराव पाटील,
के.डी.बच्छाव,भैय्या माळी,शेखर माळी,सिताराम माळी,प्रमोद भदाणे,
इ उपस्थित होते.
यावेळीपोलीस प्रशासन व ज़िल्हा परिषद आरोग्य विभागाने मदत केली,तसेच गावोगावी रॅलीचे स्वागत केले.शेवटी ना.डॉ.तुषार रंधे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्याचे आवाहन करुन आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा