Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मिक नगर व गुरुदत्त कॉलनी यांचा संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न
आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मिक नगर व गुरुदत्त कॉलनी यांचा संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:-आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी वाल्मिक नगर व गुरुदत्त शाळे त वेशभूषा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी शिरपूर पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी डॉ.निता सोनवणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर नरेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवसाचा निमित्ताने शाळेत तिनही शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषा करून आलेले होते.
सुभाष कॉलनी शाळेच्या वेशभूषा स्पर्धेसाठी तीन गट करण्यात आलेले होते. पहिली व दुसरीच्या प्रथम गटातून आश्लेषा नितीन सोनवणे प्रथम ,जन्मेयश दुर्गेश शिंदे द्वितीय,आर्यन मधुकर थेले तृतीय तर तिसरी व चौथीच्या गटातून मानवी विक्रम राजपूत प्रथम, किमया संदीप मोरे द्वितीय, रोहित चंदू पाटील तृतीय, पाचवी व सातवीच्या गटातून विशाखा मराठे प्रथम,पियुष निलेश पाटील द्वितीय, यशस्वी निवृत्ती पाटील तृतीय, क्रमांक पटकावले.गुरुदत्त कॉलनीतून नव्या संदीप वरसाळे प्रथम, नयन समाधान पाटील द्वितीय तर हिमांशू निलेश ठाकरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.वाल्मीक नगर शाळेतून ज्ञानेश्वरी शामकांत गुजर प्रथम, माळी वैभव मधुकर द्वितीय तर कश्यप सचिन सूर्यवंशी तृतीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नीता सोनवणे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गोपाल पाटील, रेखा सूर्यवंशी, गणेश साळुंके मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सोनवणे तर वेशभूषेचे सूत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तीनही शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा