Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या रोडाचा रामभरोसे नाव देऊन अनावरण



जळगाव प्रतिनिधी:आज दिनांक 11-08-2022रोजी जळगाव शहरामध्ये आम आदमी पार्टीतर्फे सिविल हॉस्पिटल रोडाचा जाहीर निषेध करण्यात आला.व रामभरोसे नाव देऊन अनावरण करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून. नारळ फोडून.निषेध करण्यात आला. 


तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची गाडी अडवण्यात आली व जळगाव शहरातील समस्यांसंदर्भात बोलण्यात आले या प्रसंगी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष.योगेश भाऊ हिवरकर.अल्पसंख्यांक अध्यक्ष.रईस कुरेशी.व जळगाव शहर आम आदमी पार्टी मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई.उपस्थित होते याप्रसंगी कार्यकर्ता माधवराव जाधव.शकील शेख.आरिफ खान. रत्नाकर खरोटे.दुर्गेश निंबाळकर. आदी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध