Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दणका..! भ्रष्टाचार गैरव्यवहार व निकृष्ट कामांचा भणका..!
माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दणका..! भ्रष्टाचार गैरव्यवहार व निकृष्ट कामांचा भणका..!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार व निकृष्ट कामांची परंपरा अबाधितपणे सुरू असून माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून या बाबी वारंवार उघड केल्या जात आहेत. मात्र त्याच्या कोणताही परिणाम प्रशासनावर झाला नसून बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभार अविरत सुरू आहे.
आता तर या प्रकरणांनी कळस गाठला असून शिरपूर तालुक्यातील बलकुवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते माधवराव दोरीक यांनी त्यांच्या गावात सुरू असलेल्या रस्ता कामाबाबत आक्षेप घेत काम निकृष्ट असल्याचा दावा करून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व बांधकाम विभाग यांच्याकडे केली होती.
तक्रार केल्याबाबत ची माहिती संबंधित ठेकेदार यास प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क करून मला तुम्हास भेटावयाचे आहे असे सांगितले मात्र तक्रार यांनी भेटण्यास नकार दिल्याने संबंधित व्यक्तीने मी मिस्तरी बोलत असून माझ्या कामाची तक्रार मागे घ्या अन्यथा मला आत्महत्या करावी लागेल अशी धमकी अज्ञात व्यक्तीने मोबाईल फोन वरून दिले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता तक्रारदार दोरीक यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली असून आपली तक्रार नोंद केली आहे व ठेकेदार यांनी फोनवरून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची नोंद यात करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाच्या कामांची गुणवत्ता ही दिवसेंदिवस ढासळत असून या व्यवहारात होणारा टक्केवारीच्या खेळ व ग्रामपंचायत एजन्सी म्हणून दिले जाणारे काम व ग्रामपंचायत कडून श्रेष्ठ ठेकेदार यास दिले जाणारे काम या सर्व खेळात 50 टक्के पेक्षा अधिकची रक्कम चे वाटप होत असल्याने तालुक्यात निकृष्ट कामांची मालिका सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा