Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे अतिरुद्र अभिषेकाचे आयोजन



 ५५५ सहपत्नीक जोडप्यांचा अतिरुद्र अभिषेक सोहळा ; रामदेवजी भक्त मंडळच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी
श्रावण मासाचे उत्तम पर्व साध्य करण्यासाठी आज दोंडाईचा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महादेव मंदिर प्रांगणात अतिरुद्र अभिषेकाचे आयोजन कळमसरा स्थित श्री रामदेवबाबा अर्चक प.पू आ बापजी यांचे मार्गदर्शनात संपन्न झाला.
सर्वसामान्य जनांचे कल्याण व्हावे,या मृत्यूलोकातील जीवनात आपल्या पाप पुण्याच्या दुर्दैवी फेऱ्यातून,त्रासातून मुक्ती मिळावी,जीवनात घडणाऱ्या सुख दुःखातुन होणाऱ्या जीवाला शिव भेटवा व सर्वांचे कल्याण व्हावे या करिता या कार्याचे विशेष नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम निःशुल्क आखला होता हे प पु बापजी महाराजांचा निश्वार्थ भाव प्रगट करत होता.

     
श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्व आहे. भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे  आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते.आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते. महादेवाची इत्यंभूत पूजाअर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं.तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात,सर्वत्र आनंद,उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. 

याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे, देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते.त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता.त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे. 
     
हे पुण्य कर्म शिव साधकांच्या हस्ते पार पडावे या संकल्पाने पवित्र अतिरुद्र महाभिषेकाचे कर्म प पु बापजी महाराज यांच्या मार्गदर्शनात तसेच वे मू केशवशास्त्री पुराणिक, ज्योतिष भास्कर डॉ शैलेश देशपांडे यांच्या प्रामुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी वे मू भिकमचंद शर्मा,महेंद्र जोशी, प्रदीप पुराणिक तसेच अमळनेर येथील विद्वत ब्राह्मण उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री रामदेवबाबा भक्त मंडळाच्या सर्व भक्तांनी मेहनत घेतली..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध