Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
केंद्रीय सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय धुळे च्या शिक्षक पालक संघावर अशासकीय सदस्य म्हणून तुषार सैंदाणे यांची बिनविरोध निवड
केंद्रीय सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय धुळे च्या शिक्षक पालक संघावर अशासकीय सदस्य म्हणून तुषार सैंदाणे यांची बिनविरोध निवड
अमळनेर प्रतिनिधी केंद्रीय सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय धुळे च्या शिक्षक पालक संघावर अशासकीय सदस्य म्हणून तुषार सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नुकतेच धुळे येथील जवाहर नवोदय विद्यालय समिती 2022 ते 23करिता शिक्षक पालक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ सैंदाणे यांची क्रियाशील पालकांचे प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून शिक्षक आणि पालक संघावर बिनविरोध निवड करण्यात आली श्री तुषार सैंदाणे हे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सदैव झटणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांची शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या न्याय हक्काच्या मागणी करिता आणि योग्य त्या लढा देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आले.
त्याप्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य माननीय सौ उषाजी माने तसेच उप प्राचार्य माननीय विल्यम सर तसेच दौंड सर माननीय योगेश जी साळुंखे सर आणि कर्मचारी वृंद यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मनापासून अभिनंदन केले सदर सुयोग्य निवडीबद्दल माननीय खासदार सुभाष जी भामरे माननीय आमदार जयकुमार जी रावल माननीय आमदार स्मिताताई वाघ माननीय आमदार डॉक्टर बी एस पाटील माननीय आमदार डॉक्टर फारुख जी शहा तसेच अमळनेरचे आमदार अनिल दादा पाटील माननीय आमदार डॉक्टर शिरीष दादा चौधरी तसेच धुळे येथील नामवंत पॅनल जज डॉक्टर योगेश सूर्यवंशी सर तसेच प्राचार्य डॉक्टर डी एस सूर्यवंशी सर आणि ओ एचडी गोकुळ धनगर सर पत्रकार सुनील पाटील आदींनी भावी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा