Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
पुष्पा - ने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या आवारातुन मौल्यवान चंदनाचे झाड चोरले..!हा पुष्पा नेमका कोण ? पोलीसानसमोर तगडे आव्हान
पुष्पा - ने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या आवारातुन मौल्यवान चंदनाचे झाड चोरले..!हा पुष्पा नेमका कोण ? पोलीसानसमोर तगडे आव्हान
धुळे प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यात व शहरात झाडांची सर्रास कत्तल करण्याचे प्रकार वाढले असतांना आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानातील झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत.रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या आवारात असलेले मौल्यवान चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
जिल्हाधिकारी बंगल्यावर पोलिसांचा चोविस तास जागता पहारा असतो. असे असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देवून चक्क चंदनाचे झाड लांबविण्यात चोरट्यांना यश आलेच कसे ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदन झाड चोरणाऱ्या चोरट्यांला पकडण्याचे आवाहन आता धुळे शहर पोलिसांसमोर असणार आहे.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांची हिंमत वाढल्याचेच यावरून दिसून येत आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा