Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
सरस्वती विद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयातील माता पालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य शिबिरासाठी डॉ. राहुलकुमार कामडे (MD) प्राध्यापक आयुर्वेद महाविद्यालय बोराडी व श्री अंकुश पाटील तसेच वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.
शिबिराचा अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरविंद वैद्य होते. श्री प्रभाकर शिंपी श्री राधेश्याम गुप्ता श्री शशीकुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप लोहार व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ.श्री राहुल कामडे यांनी महिला आरोग्य संवर्धन संबंधी मार्गदर्शन करताना आरोग्य संबंधित काळजी महिलांचा आहार तसेच वयोमानानुसार होणारे आजार त्याचे उपचार व काळजी यासंबंधी अनमोल मार्गदर्शन करून उपस्थित महिला पालकांची आरोग्य तपासणी केली.
त्यात प्रामुख्याने वजन उंची बी एम आय तसेच बीपी,रक्तगट व हिमोग्लोबिन प्रमाण या तपासण्या करण्यात आल्या.शिबिरात एकूण 124 रक्तगट व 72 हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. शिबिरात मोठ्या प्रमाणात माता पालकांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर परिश्रम घेतले श्री.विजय बागुल यांनी सूत्रसंचलन केले
✒️✒️🖋️🖋️✒️✒️🖋️🖋️
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा