Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

केतन पंडित यांचा तर्फ़े सर्व कावड भक्तांना फ़राळ व पाणी वाटप..!



शिरपूर प्रतिनिधी:दिनांक८/८/२०२२ 
श्रावण महिना' म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण,पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह ! महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.श्रावण महिन्यातला सोमवार हा इच्छा पूर्ण करणारा दिवस मानला जातो. कावड ची सरूवात
भगवान परशुरामांनी केली होती.
'श्रावण' महिना सुरु झाला की भारतात विविध ठिकाणी कावडयात्रांना सुरुवात होते. 

गंगा अथवा इतर नद्यांतील 'जल' कावडीने आणून ते महादेवाच्या ठराविक मंदिरातील पिंडीवर अभिषेक म्हणून घालावयाचे,म्हणजे ही यात्रा सुफळ-संपूर्ण होते,असं मानलं जातं.या महिन्यात देशात अनेक भागांत खांद्यांवर अशा कावडी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते.
त्याच प्रमाणे शिरपुर सुवर्ण नगरीत प्रथम च कावड यात्रा चे आयोजन करण्यात आले दिनांक ८/ ८/ २०२२ श्रावण सोमवार रोजी तापी नदी कुरखळी येथुन शिरपुर शहरा पर्यंत करवंद नाका दुपारी 3 वाजता सर्व कावडभक्तांना फ़राळ व पाणी वाटप करण्यात आले.

या वेळी उपस्थित केतन पंडित यश जगताप, केतन पवार,रोहीत सालुंखे  हिमांशु राजपुत,व आदी  
उपस्थित होते.....!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध