Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा पोलीस स्टेशनला गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न..!



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी येथील पोलीस स्टेशनच्या आवारात शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत गणेश उत्सवानिमित्त शांतता समिती बैठक देण्यात आली.सदर बैठक पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. 

यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे ,पीएसआय रवींद्र केदार, पोलीस नाईक आबा भिल ,अनंत पवार त्याचप्रमाणे शहरातील शांतता कमिटी सदस्य प्रकाश नाना चौधरी,भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी,युवराज माळी,नगरसेवक अरुण देसले,जलालदादा शेख, शिवसेना शहराध्यक्ष संतोष देसले, वि.का.सो.चे सदस्य मनिष देसले, पोलीस पाटील युवराज माळी भडणे, सुरेंद्र परदेशी चिलाणे,सुरेश पाटील जोगशेलु ,पो.काॅ.इ.एस.पठाण,दिपक भिल,आर.एस.मांडगे,चेतन कंखरे,
गोपाल माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ह्यावेळी शहरात व तालुक्यातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रथम पोलीस स्टेशन ला मंडळाची नोंदणी आवश्यक आहे.

मंडळाची आरास करतांना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाहीत असे देखावे तयार करू नयेतव्यक्तीद्वेष 
 वैयक्तिक भावना दुखावल्या जातील असे ही देखावे सादर केले जावु नये. जातीय सलोखा,देशप्रेम, समाजप्रबोधनात्मक,एकतेचे दर्शन असे देखावे सादर केल्यास लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा हेतू सफल होईल.शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर वाईट प्रवृत्तीला आळा बसेल.शिंदखेडा शहर जातीय सलोख्याचे शहर असल्याचा इतिहास आहे. 

हिंदू मुस्लिम दोन्ही धर्म एकोप्याने सण साजरा करतात.मागील वर्षी व आताचा विसर्जन मार्ग यांची शहानिशा करून मार्ग निश्चित ची परवानगी दिली जाईल. निश्चित केलेल्या मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल.त्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आपल्या सुचना वजा मार्गदर्शन मनोगतातुन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी सांगितले. ह्या प्रसंगी प्रकाश चौधरी,जलाल शेख,प्रविण माळी, अरुण देसले यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.ह्यावेळी शहरातील व तालुक्यातील बहुसंख्येने गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध