Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

भाजपच्या धुळे जि.उपाध्यक्ष श्री चंद्रजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने साक्री तालुक्यातील गोरगरिब जनतेसाठी शासकीय योजनांचे शिबिराचे आयोजन



साक्री तालुक्यातील मालपुर गावचे भूमिपुत्र तथा भाजपचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष व विद्या विकास मंडळ साक्री चे संचालक श्री चंद्रजीत सुरेश भामरे धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 19/08/2022 रोजी सकाळी अकरा वाजता राज्य शासनाच्या शासकीय योजनांचे शिबिर व बुथ सशक्ती केंद्र मेळावा आयोजित केलेला आहे. तरी भाजप साक्री तालुका युवा मंच साक्री यांच्यावतीने या समाज उपयोगी कामाचे आयोजन करण्यात आले असून साक्री पिंपळनेर रोडवरील सुमंगल लॉन्स येथे हे शिबिर होणार आहे. तरी सर्व साक्री तालुका वासियांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील गोरगरीब तळागाळातील शेतकरी, मजूर,विद्यार्थी,महिला,तरुण, जेष्ठ नागरिक,यांनी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये या प्रामाणिक उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.असेही संबंधित आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बबनराव चौधरी साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. नारायण पाटील व पिंपळनेर मंडळ अध्यक्ष इंजि.मोहन सूर्यवंशी,धुळे भाजप सरचिटणीस शैलेंद्र आजगे साक्री तालुका भाजपा अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे साक्री शहर अध्यक्ष कल्याणजी भोसले आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यत्वे साक्री तालुक्यात धुळे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष श्री चंद्रजीत सुरेश पाटील(भामरे)यांना मानणारा मोठा तरुण वर्ग या तालुक्यात आहे.भाजप राज्याचे प्रांतिक सदस्य व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश रामराव पाटील व माझी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यात तरुणांमध्ये चंदर भैय्यासाहेब यांचा नेहमीच धबधबा राहिलेला आहे त्यांच्या मातोश्री सौ मंगलाताई भामरे ह्या शिक्षण सभापती असून जिल्हा परिषदेत अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम चंद्रजीत पाटलांमुळे मार्गी लागले आहे तसेच राजकीय व सामाजिक कार्यात ही ते नेहमी अग्रेसर राहतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून त्यांचे समाधान कसे करता येईल यावर त्यांचा भर असतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब वंचितांसाठी सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ एका छताखाली दिला जाणार आहे. उदा. शेतकरी पीएम किसान योजना,पिवळे रेशन कार्ड, आधार पॅन कार्ड केवायसी, जनधन बँक खाते उघडणे, उज्वला गॅस योजना,श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना,ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र तयार करणे, जातीचा दाखला,डोमासेल, उत्पन्नाचा दाखला,इ.आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.या शिबिरात आलेल्या सर्वच नागरिकांसाठी भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली आहे.असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध