Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

नाशिक जिल्ह्यातील M.V.P. च्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचेच वर्चस्व कायम राहणार असल्याचे भाकीत युवा उद्योजक श्री पवन मोरे यांच्याकडून करण्यात आले



नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था मानले जाणारी मराठा विद्या प्रसारक संस्था याचे नाशिक जिल्ह्यात खूप कुठे जाळे कार्यरत आहे त्यातच मराठा विद्या प्रसारित संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय प्रतिष्ठेची व महत्वाची मानली जाणारी ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचाच एक भाग आहे.मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सद्यस्थितीत दोन पॅनल एकमेकांविरोधात उभे टाकले आहे. स्वर्गीय वसंत पवार साहेब माजी मविप्रचे अध्यक्ष यांच्या पत्नी श्रीमती नीलिमा ताई पवार यांचा प्रगती पॅनल आणि त्यांचा विरोधात एड. नितीन ठाकरे यांचा परिवर्तन पॅनल सध्या एकमेका विरोधात उभे टाकले आहेत.नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मविप्र ची निवडणूक जिंकणे म्हणजे नाशिक जिल्ह्याची राजकीय धुरा सांभाळण्यासारखे काम आहे. परंतु स्वर्गीय वसंत पवार यांचे राजकीय हितसंबंध पाहता त्यांच्या पत्नी श्रीमती निलिमा पवार यांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे. वसंत पवारांच्या मृत्यूनंतर मविप्र चा कारभार अतिशय पारदर्शक व प्रामाणिकपणे चालवला आहेत हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ज्ञात आहे परंतु साहेबांच्या मृत्यू नंतर मविप्र ची निवडणूक व कारभा रावर अनेक सदस्यांच्या नाराजीचा फायदा घेत व तेथे होत असणाऱ्या आर्थिक गोटाळ्याचे आरोप करत थेट एड.नितीन ठाकरे यांनी परिवर्तन पॅनल ची स्थापना करून सत्तांतर करण्याचा चंग बांधला आहे.श्री ऍड. नितीन ठाकरे यांनी यावेळी श्रीमती पवार यांना खुले आव्हान दिले आहे. परंतु श्रीमती नीलिमा पवार यांचा जिल्ह्यातील राजकीय धबधबा पाहता त्यांचा पराभव करणे श्री नितीन ठाकरे यांना वाटते तेवढे सोपे जाणार नाही.लोकांमधील असलेल्या अँटी इन्कमबनसीचा जोरावर ठाकरे यांचा विजय होणे सध्या तरी शक्यप्राय वाटत नाही असेही लोकांमध्ये बोलले जात आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यातील निफाड,सटाणा, मालेगाव, अशा अनेक तालुक्यामध्ये अधिक मताधिक्य असल्याने नेमके काय समीकरण होणार यावर जनतेचे लक्ष लागून आहे. यावेळी श्रीमती नीलिमा पवार व नाशिकचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांची भेट घेऊन स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कान साखर कारखान्याचे चेअरमन युवा उद्योजक पवन मोरे यांनी देखील या विषयावर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आपला विजय निश्चित होणार असल्याचे भाकीत केले यावेळी केले आहे.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध