Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

साक्री पंचायत समितीमध्ये साडेसात हजाराची लाच स्वीकारताना कंत्राटी अभियंता लाचलुचपत विभागाचा ताब्यात



साक्री प्रतिनिधी:साक्री तालुक्यातील पंचायत समिती साक्री येथे घरकुलासाठी लाभार्थ्याला धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदारा कडून साडेसात हजार रुपयाची रोकड लाच स्वीकारताना कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध साक्री पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो.साक्री येथील पंचायत समिती घरकुल गृहनिर्माण विभागाचा कंत्राटी अभियंता वैभव हिम्मत हल्लोरे वय वर्ष 25 याने तक्रारदाराकडे घरकुलाचा धनादेश काढून देण्यासाठी साडेसात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदानाने याबाबत धुळे लाचलुचपत विभागाला तक्रार दाखल केली होती.

संबंधित लाख लूचपत विभागाच्या धुळे पथकाने आज दि.17/08/ 2022 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास साक्री येथील पंचायत समितीतील सापळा लावून यावेळी पंचायत समितीच्या आवारात कंत्राटी अभियंता वैभव हल्लोरे याला साडेसात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात ताब्यात घेतले सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक धुळे श्री.अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे मंजीत सिंग चौहान,राजन कदम,प्रशांत बागुल,भूषण शेट्टी,सुधीर मोरे,संतोष पावरा,
शरद काटके,कैलास जोहरी,संदीप कदम,
रामदास बारेला,गायत्री पाटील,रोहिणी पवार,
जगदीश बडगुजर,आदींनी कारवाई केली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध