Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

चोपड्यातील प्रेम प्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर,तिच्या प्रियकराची गोळी झाडून केली हत्या




चोपडा प्रतिनिधी: जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना चोपड्यात घडली आहे.चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला असून त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती असे की,चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडा लगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तर दोघांचा शोध सुरु आहे.

वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय,२२, रा.रामपूरा चोपडा) अशी मयत युगलाची नावे आहेत.प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत…

सदर घटनेत चार आरोपी असून करण उर्फ कुणाल समाधान कोळी वय १७ वर्ष,तुषार कोळी,भरत संजय रायसिंग , निलेश समाधान कोळी अशी आरोपींची नावे आहेत…



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध