Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
७५वा स्वातंत्र्याच्या "अमृत महोत्सव" प्रसंगी जनजागृती रॅली...!
शिरपूर प्रतिनिधी:आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, वरवाडे येथून ७५व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त १३,१४,१५ आॅगस्ट हर घर तिरंगा फडकविणार आहोत या साठी वरवाडे परिसरात स्वातंत्र्याचा जयघोषात परिसर दणाणून गेला.या जयघोषात हर घर तिरंगा लावा,संविधानाचा जयजयकार, क्रांतीकारकांचा विजय असो,अमृत महोत्सवाच्या जयघोषात परिसरातील वातावरण महोत्सवमय झाले.
रॅली वरवाडे परिसरातील गल्लोगल्लीतुन मध्यवर्ती ठिकाणी संत सावता माळी मंदीरा जवळआल्यावर क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईतील अहिंसेचा मार्ग, निस्वार्थ सर्वस्वाचा त्याग,समर्पणाची भावना,राष्ट्रप्रेम, संघर्षाची लढाई,गृहस्थाश्रमाचा त्याग यावर आपले मत मांडले.
यावेळी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि क्रांतीकारकाचे बलिदान यावर शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक मांडले.यावेळी शिरपुर वरवाडे नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी शि.व.न.पा.नगरसेवक दिपक महादु माळी,जेष्ठ नागरिक विठ्ठल बोटकु पाटील,भाजपा शहराध्यक्ष आध्यात्मिक संघटना संतोष महारु माळी,
सा.कार्यकर्ता महादू दगा माळी,मोहन भटु माळी,उत्तम पाटील,हिरामण दगा माळी पुजारी बेलदार दादा यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले.हंसराज पाटील,मनिषा पाटील,
योगिता भामरे,सुमित देवरे,तुळशीराम पावरा,राकेश शिरसाठ,विद्या बारी,
दिपक गिरासे,दिनेश पावरा व चंदन माथने यांनी रॅलीच्या यशस्वीतेकरिता परीश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा