Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट
नंदुरबार, प्रतिनिधी: दि.13 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन नागरिकांमध्ये वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होवून जिल्ह्यातील नागरीकांना निसर्ग अनुभवता यावा,परिसरातील नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा या हेतुने नंदुरबार वनविभाग,चिंचपाडा वनक्षेत्रातंर्गत नवापूर तालुक्यातील दापूर येथील ‘गिधकडा धबधबा निसर्ग पाऊलवाट’ येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी श्रीमती. खत्री यांच्या हस्ते दापूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या पॅगोडा, प्रवेशद्वार,नैसर्गिक पाऊलवाट,मचाण, महिला व पुरुषासाठी चेजिंग रुमचे उद्घाटन करण्यात आले.या परिसरात नागरिकांनी पावसाळी पर्यटनासाठी येण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, धुळे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक दि.वा. पगार,उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी, वनव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच दापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा