Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रॅली संपन्न..!


नंदुरबार, प्रतिनिधी: दि.13 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबारच्यावतीने आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
या रॅलीस राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. रॅलीत ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देण्यात येवून ही रॅली नवापूर चौफुलीपासून सुरु करण्यात येवून कोकणी हिल,धुळे चौफुली, श्रॉफ हायस्कुल मार्ग अंधारे स्टॉप येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ.आनंद जामकर, प्रशासकीय अधिकारी डॉ.अमोल किंनगे, डॉ.हरीष वानखेडे,डॉ.दिप्ती निमजे,डॉ.निखिल गोडे डॉ.अमोल वाघमारे, रॅलीचे मुख्य संयोजक डॉ. प्रशात पाटील,लघुलेखक साहेबराव मोरे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप पावरा,आर.डी.मुळे,साबीर काजी, मनोजसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी व विद्यार्थ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध