Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

अनेर नदीच्या पुलावरून हातेड येथेल महिलेची उडी घेऊन आत्महत्या



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर चोपडा रोडवरील तोंदे गावाजवळील अनेर नदीच्या पुलावरून हातेड ( ता.चोपडा ) येथील महिलेने काल ( दि १३ ) सकाळी १० वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.सदरची माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि उमेश बोरसे यांना कळविण्यात आल्यानंतर ते आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी हजर झाले. संबंधित महिलेची तपासणी केली असता या महिलेकडे ३२ हजार रुपयाची रोकड व हातेड ते गलंगीपर्यंतचे एसटी तिकिट आढळून आले.

पोलिसांनी चौकशी केली असता सदरची महिला हातेड येथील बेबाबाई शिवाजी सनेर (५०) असल्याची खात्री पटविण्यात आली.बेबाबाई या शिवाजी भीमराव सनेर यांच्या पत्नी तर मिलिंद शिवाजी सनेर यांच्या आई होत्या.मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पाठविण्यात आले असुन ३२ हजार रुपये त्यांच्या पतिच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सपोनि उमेश बोरसे यांनी सांगितले.थाळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व विजय ठाकुर करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध