Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

खर्दे विद्यालयात अमृत महोत्सव निमित्त आजी-माजी सैनिकांचा यथोचित सन्मान...!



शिरपूर प्रतिनिधी तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला माजी कॅप्टन डॉ.मोहन गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सैनिक किशोर पटेल,संदीप पटेल ,संजय चौधरी, लोटन सोनवणे, राकेश शिंपी, नाना पवार ,योगेश पारधी, मधुकर जाधव डॉ.मोहन गुजर या सर्व आजी-माजी सैनिकांचा प्राचार्य पी.आर. साळुंखे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी सरपंच सविताबेन पटेल,उपसरपंच नितीन चौधरी,पोलीस पाटील सुरेश सोनवणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पालक बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे यांनी सैनिकांचे त्यागमय जीवनातून देश सेवेचे महत्व पटवून दिले.डॉ.मोहन गुजर यांनी स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर देशावरची आक्रमणे कशी परतून लावली याबाबत विचार मांडले .याप्रसंगी माजी सैनिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.तद्नंतर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे.पाटील व आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर .साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. बी.धायबर,  अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,ए.जे. पाटील,पी.एस अटकळे,बी.एस. बडगुजर,बी.एस.पावरा,सुनीता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम, मनीषा पाटील ,युवराज मिठभाकरे, राकेश पाटील यांनी प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध