Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
साक्री तालुक्यातील तरूणांची आम आदमी पार्टीत जोरदार एन्ट्री
साक्री प्रतिनिधी:प्रदेश अध्यक्ष माननीय श्री बिपिन पाटील साहेब यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला शासकीय विश्रामगृह साक्री येथे धुळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर अशोक पाटील धुळे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास मोठाभाऊ भदाणे यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन केले होते.
धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी संजय शिवाजी बहिरम साक्री तालुका अध्यक्षपदी चंद्रशेखर अहिरराव साक्री तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण काकुस्ते साक्री तालुका सचिव पदी राजेंद्र सोनवणे पिंपळनेर विभाग प्रमुख पदी राजेंद्र राऊत साखरी तालुका कोषाध्यक्षपदी डोगरू बहिरम साक्री तालुका संपर्कप्रमुख पदी सुनील सोनवणे साक्री तालुका संघटक पदी बाळू साळुंखे अशाप्रकारे साखरी तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष माननीय बिपिन पाटील साहेब यांनी संबोधित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातचा आम आदमी पक्षाचा झंजावात पाहून पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरच्या धाडी टाकून बदनाम करण्याचे षडयंत्र पंतप्रधानांना शोभत नाही जात पक्षाच्या धोरणामुळे विदेशात भारताची कीर्ती होते.
त्या पक्षाच्या पाठीशी पंतप्रधानांनी गौरवाची थाप देणे अपेक्षित असतानाकाम करणाऱ्यांच्या मागे इ डी सीबीआयच्या चौकशी लावून बदनाम करण्याचे षडयंत्र आरंभले आहे ते कधीही भारतातील जनता फलित होऊ देणार नाही सामान्य जनतेला माहित आहे की कोण हे सत्तेचे खेळ खेळत आहेतआज संपूर्ण भारतात लोकशाहीने निवडून आलेले राज्य सरकार उलथून इडी सीबीआयच्या जोरावर सत्ता हस्तगत करण्याचे जे षडयंत्र भारतीय जनता पार्टीने आरंभले आहे ते शरयंत्र सामान्य जनताच काय दूध खुळा पोरगा ही ओळखतो त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भ्रमात राहू नये की आम्ही इडी व सीबीआयच्या जोरावर देशात काही करू शकतो आता सामान्य जनताच काय शेतकरीही प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत की पहिल्या मिटींगला आमचे कर्ज माफ करणारे पंतप्रधान देशाला पाच कोटी रोजगार देणारे शेतकरी बांधवावांन हमी भाव स्वामीनाथन आयोग शेतकरी आत्महत्या बेरोजगारी कांदा प्रश्न इत्यादी विषयावर मा पंतप्रधान आज रोजगार व विकासाच्या गोष्टीवर गप्प का बसले आहेत ज्याप्रमाणे 1947 ला इंग्रजांना भारतातून घालवले त्याप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीला भारतातून हद्दपार करून नवीन विकासाच्या वाटेकडे नवीन स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्याला झटावे लागणार आहे.
करो या मरो चा नारा देऊन प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकरी बांधवांना रस्त्यावर उतरावा लागेल याच भूमिकेतून आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी तयारी ठेवून गाव खेड्यात जाऊन आम आदमी शेतकरी संघटनेचे कार्य शेतकऱ्यांप्रतीचे धोरण प्रत्येक माणसाच्या मनात उतरवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे आता पुढील काळात भारतीय जनता पार्टी व आम आदमी चाच सामना होणार असून इतर पक्ष भष्ट्राचार च्या कलंका मुळे देशाच्या जर जर झाले असून सामना करण्यासाठी टिकणार नाहीत असे आवाहन साक्री तालुक्यातील आम आदमी शेतकरी संघटनेच्या बैठकीत प्रदेश अधक्ष बिपीन पाटील यांनी केली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा