Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बैल बाजार परिसराकडे दुर्लक्ष ! बैल बाजारातील दलदलीमुळे परीसरात साथीचे रोग वाढण्याची शक्यता !




शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील शेतक-याचे अतिशय महत्वाचे व नेहमीच भरगच्च अश्या गर्दीने गजबजलेले स्थान म्हणजे कृषी उत्पन्न बजार समिती आहे.या ठिकाणी शेतकरी,कष्टकरी,हामाल,मापाडी,
आडत्या व व्यापारी असे सर्व प्रकारचे लोक नेहेमीच हजर असतात.त्यातच या परिसरात अतीशय अनाधिकृतपणे रात्रीच्या उशीरापर्यत सुरु असणा-या काही मिल्स जसे भुसार मिल्स,ऑईल मिल्स,मिरची पाडर मिल्स कृषी पशुखाद्य मिल्स असे अनेक प्रकारचे मिल्सधारक व त्यात काम करणारे कामगार वर्ग दिवसातून जवळपास आठ ते दहा तास या परिसरात असतात.अश्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल बाजार परिसरात पडलेल्या पावसामुळे अतिशय दलदलीचे स्वरुप आलेले आहे.


याबाजारतील होण्या-या उलाढालीपासून बजार समितीस मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.असे असतांना त्या परिसराकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते.खरे पहाता बाजार समितीने पावसाळा सुरु होण्यापुर्वीच या सर्व परिसरात रस्ते व पावसाचे पाणी सुरळीतपणे बाहेर जाईल याची व्यवस्था करणे आपेक्षीत असते.असे असतांना या परिसरात भरगच्च अश्या चिखलामुळे व त्यातच बाजारातील जनावराच्या शेण व मुत्रामुळे अतिशय दुरगंधीचा वास येतो आहे.


व अश्या ठिकाणी शेतक-यांना आपली जनावर तासंन तास घेऊन उभे राहावे लागते.या ठिकाणी डासांचे प्रमाणात झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होऊन साथीच्या रोगांची लागण होऊ शकते,व असे झाल्यास प्रत्येक गावागावातून व खेडयापाड्यातून येणारे शेतकरी व कामकरी कष्टकरी वर्गातील लोकांमुळे तालुकाभर फ़ैलाव होण्यास वेळ लागणार नाही.तरी कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळीच इकडे लक्ष देऊन त्यावर उपाय योजना करावी असे येथे येणा-या शेतकरी,कष्टकरी कामागारांनी आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्र प्रतिनिधीकडे मत व्यक्त केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध